चिपळूण : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम संपविण्यासाठी जागतिक स्तरावरुन मोठे प्रयत्न डावी विचारसरणी करत आहे. या धोक्यांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी मांडले. ते चिपळूण येथे देवर्षी नारद पत्रकार सन्मान कार्यक्रमात बोलत होते.
चिपळूण मधील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आज देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधन व लेखक अभिजीत जोग, जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक श प्रसाद काते

होते. यांच्या हस्ते रायगडमधील मुरुडचे पत्रकार मेघराज जाधव, सिंधुदुर्गमधील शेखर सामतं (तरुण भारत), समीर जाधव (दै. पुढारी, चिपळूण), मयुरेश पाटणकर (दै. सकाळ गुहागर) आणि यु ट्वुबर ऋषभ तोडणकर (गावखडी, रत्नागिरी) यांना देवर्षी नारद पत्रकार सन्मान देवून गौरविण्यात आले. देवर्षी नारदांची मुर्ती, नारद मुनींच्या कार्याची माहिती असणारे पुस्तक व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक श्री. प्रसाद काथे यांनी विश्र्व संवाद केंदाच्या कार्याची माहिती व पत्रकार सन्मान पुरस्करासाठी असलेल्या निवड प्रक्रियेची माहिती दिली.
अभिजित जोग म्हणाले की, अमेरिकसह अन्य तीन देशांनी निर्माण केलेली डिप स्टेट ही व्यवस्था काही देशांमधील सत्ता उलथवून लावली. जगातील विविध देशात सुदृढ लोकशाही यावी असे दाखवून या देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न डिप स्टेटच्या माध्यमातून होत आहे. भारतातही हा प्रयत्न सुरु आहे. त्यासोबत सांस्कृतिक मार्स्कसिझमचा धोकाही आपल्यासमोर आहे. वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला भारत देश हिंदुत्वाच्या धाग्यांनी घट्ट जोडला गेला आहे. हे धागे तोडण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे, आपल्याच देशातील काही लोकांना पैसा आणि टुलकीट देवून काम सुरू आहे. यासोबतच मुस्लिम जिहादचा धोका आहे. या सर्व धोक्यांबाबत हिंदू समाजाला जाणिव करुन देण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाला विश्र्व संवाद केंद्राचे डॉ. निशिथ भांडारकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदिप खरे, संघाचे विभाग संघचालक दत्ता सोलकर, प्रांत कार्यकर्ते प्रसाद आगवेकर, विभाग सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, चार्टर्ड अकाउंटंट मंदार लेले, घरडा अभियांत्रिकीमधील प्राध्यापक डॉ. सुदेश आयरे, डॉ. विकास नातू, युनायटेडचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे, व्यापारी उदय चितळे, लोटिस्माचे संचालक विनायक ओक, किर्तनकार शरद तांबे, ज्योतिषी खांडेकर, यांच्यासह चिपळूणमधील प्रतिथयश मान्यवर उपस्थित होते.