लोटे : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युथ फेस्टीव्हल झोनल राउंडचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी घरडा महाविदयालयामध्ये करण्यात आलेले आहे. सदर युथ फेस्टीव्हल हा विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत विविध १२ झोन मध्ये आयोजित केला जातो त्यापैकी ९ वा झोन रत्नागिरी नार्थ असून यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर व चिपळूण या तालुक्यातील मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणा-या सर्व प्रकारच्या महाविदयालयांचा समावेश होतो.
प्रत्यक्ष कार्यक्रम बुधवार दि. ५ ऑगस्टला असला तरी याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी घरडा महाविदयालयात होणार आहे. या फेस्टीव्हल मध्ये डान्स, नाट्य, म्युझिक, फाईन आर्ट अशा विविध प्रकारांमधील कलांचा समावेश असून सुमारे २० ते २५ महाविदयालयातील विविध कलाप्रकारांमध्ये ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतील असा अंदाज आयोजकामार्फत करण्यात आला आहे.
. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के.पाटील, रजिस्ट्रार मा. संदिप मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून जास्तीत जास्त विद्यार्थ्य़ानी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.