मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील जे डब्ल्यू मॅरिएट सहार या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ या युनियनची स्थापना करण्यात आली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज जे डब्ल्यू मॅरिएट सहार येथे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत यांच्यासह कर्मचारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जे डब्ल्यू मॅरिएट सहार या पंचतारांकित हॉटेलच्या अनेक कामगारांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सदस्यत्व स्वीकारले.

या प्रसंगी रविंद्र चव्हाण यांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

यावेळी हॉटेलचे महाव्यवस्थापक सचिन मायलावरपू, एचआर विभागाचे संचालक वल्लभी वैद्य, तसेच संचालक मंगेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी रविंद्र चव्हाण यांचा हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.