चिपळूण (विशेष प्रतिनिधी): चिपळूणमध्ये वनविभागाच्या भिंतीवर रातोरात कमळ चिन्ह काढण्यात आले होते यावरून वाद निर्माण झाला होता. यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यासोबतच नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोठे आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला .

संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी लावून धरली. आज चिपळूणमध्ये याच विषयावर जोरदार राजकीय चर्चा होत होती. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तसेच वन अधिकारी आणि पोलिसांना निवेदने देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ताबडतोब दखल घेतली. कालांतराने वन विभागाच्या शासकीय भिंतीवर काढण्यात आलेले कमळ चिन्ह हटवण्यात आले.