माखजन( गौरव पोंक्षे ) : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा अशी आग्रही मागणी राज्यातील शिक्षक समन्वय संघाकडून केली जात आहे.या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाकडून १६ व १७ रोजी मुंबई च्या आझादमैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यासाठी हजारो शिक्षक आझाद मैदानावर येणार आहेत.
सन २००१ पासून राज्यात विनाअनुदानित धोरण लागू झाले.२००१ पासून,विनवेतानाची, विनाअनुदानित ची सुमारे २० वर्षे व अलीकडीलत अंशतः अनुदानित कडील ५ ते ६ वर्षे अशी यामुळे राज्यातील सुमारे ६५ हजार शिक्षक बेजार झाले आहे.सेवेत असताना फारस काही मिळालं नाही आणि निवृत्ती नंतर ही काहीच नाही यामुळे धर्म संकटात सापडलेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांनी, निवृत्ती नंतर किमान पेन्शन योजना लागू करा अशी मागणी केली जात आहे.
अंशतः अनुदानित शिक्षकांची डी.सी.पी.एस,एन.पी.एस ची खाती अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत.पण अंशतः अनुदान सुरु करताना व प्रत्येक वाढीव टप्पा देताना सदर योजनां मध्ये सामील होऊ असे शिक्षकांकडून हमी पत्र घेण्यात आले होते.परंतु यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.
निवृत्ती नंतर अंशतः अनुदानित शिक्षकांना आपल्या कुटुंबाची.गुजराण करण्यासाठी नव्या संधी,व नोकरया कराव्या लागत आहेत.
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने,राज्यातील १००% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने खाली वैद्यकीय खर्चाचे लाभ देण्याबाबत निर्णय जारी करण्यात आला.यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांचा समावेश नं केल्याने तीव्र शब्दात नाराजीचे सूर उमटत आहेत.अंशतः अनुदानित शिक्षक आजारी पडत नाहीत का?त्यांचे नातेवाईक आजारी पडत नाहीत का असा सवाल शिक्षक विचारत आहेत.
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लेखाशीर्षकांचे पगार देखील वेळेत होत नसल्याने हा देखील विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
शिवाय १ ऑगस्ट २०२६ पासून अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना,वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्या अशी मागणी होत आहे.तसेच ऑगस्ट,सप्टेंबर २०२५ या महिन्यांचे वाढीव टप्प्याने थकीत असलेले वेतन अदा करा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.
सदर आंदोलनाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,मुख्य सचिव,शिक्षण सचिव यांना देण्यात आले आहे.शिवाय आझाद मैदान पोलीस ठाण्यात देखील निवेदन दिले आहे.