मंडणगड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मोफत ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री उदय सामंत (पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा व उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री योगेश दादा कदम (गृहराज्यमंत्री व महसूल राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री दीपक घाटे (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी), योगेश पाटील (संस्था प्रतिनिधी), तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या शिबिरात १८५ ज्येष्ठ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तपासणीसाठी मातोश्री हॉस्पिटल मंडणगड व प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड येथील तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ. प्रदीप मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम कंकाळ, डॉ. भावठाणकर, डॉ. आसिफ खान पठाण, डॉ. संजय पिलंकर, डॉ. मंदार आदित्य राम रेगडे तसेच श्रीमती भोसले, योगिता बैकर, अक्षदा मरसडे, रमा पवार, जानवी सोलंकी, तृप्ती महाडिक, अक्षदा मर्चंडे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, उपचार मार्गदर्शन तसेच पुढील शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. मोफत औषधे, ईसीजी तपासणी व आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.