मुंबई : अमरावती जिल्हयातील परतवाडा येथील सेक्स रॅकेटची व्याप्ती अतिशय मोठी असून या प्रकरणात कोणत्याही पक्षांनी राजकारण न आणता पिडीत मुलींना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर हे उपस्थित होते.
या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना श्री. कुलकर्णी म्हणाले, सुमारे तीन दिवस अल्पवयीन मुलींचे, तरुणींचे अत्यंत अश्लील व्हिडीओ काही हॅण्डलवरून प्रसारीत करण्यात आले आणि पाहता पाहता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अशावेळी केवळ भाजपानेच पुढाकार घेत पोलिसांशी संपर्क साधला आणि भाजपानेच पहिले आंदोलन केले. यात स्थानिक मुली मोठ्या प्रमाणावर अडकल्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताच त्यांनी तक्रारदार समोर यायच्या आधी कोणतीही हयगय न करता सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश दिले आणि काही तासांतच मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.