खेड : – तालुक्यातील बिजघर लाववाडी येथील कु. अपुर्वा अरुण कदम (१५) या अल्पवयीन युवतीचे अपहरण शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ०२:३० वाजताच्या सुमारास घडल्याची फिर्याद युवतीची आई सौ. अस्मिता अरुण कदम (वय- ४०, रा. बिजघर-लाववाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हिने येथील पोलीस स्थानकात दिली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर ६९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) अन्वये येथील गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे करीत आहेत. अपहरण झालेल्या युवतीविषयी कोणाला माहीती मिळाल्यास मोबाईल नंबर 9420706438 वर संपर्क साधावा. माहीती देणा-याचे नाव गुपीत ठेवले जाईल. आणि योग्य ते बक्षिस दिले जाईल. असेही पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे यांनी सांगितले आहे.
बिजघर येथील १५ वर्षीय अल्पवयीन युवतीचे अपहरण ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल !
