मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नाशिक व मालेगावमधील पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार शोभाताई बच्छाव यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, अखलाख अहमद वाहिद उझमा, अकबर गुलाब शेख, फिरोझ अब्दुल रेहमान खान, फैजल खलील शेख यांचा पक्षप्रवेश टिळक भवनमध्ये पार पडला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस नेते राहुलजी गांधी हे लढा देत आहेत. राहुलजी गांधी यांचे नेतृत्व व काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून या सर्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचा विचार घरोघरी पोहचवा, असे आवाहन यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.