खेड : – येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार उत्साहात पार पडला. या उपक्रमातून खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा अल्पसंख्यांक खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा सोशल प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता यांच्यासह खेड तालुक्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
