खेड :- येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माहे एप्रिल २०२६ मध्ये दिलेल्या जे.ई.ई.,बी.आर्च. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या शाळेची विद्यार्थिनी कु. जिया मेहता हिने अभूतपूर्व यश संपादन करत भारतामध्ये द्वितीय क्रमांक (जनरल-इडब्ल्यूएस कॅटेगरी) पटकावला आहे.
कु. जिया हिने ९९:९७ पर्सेंनटाईल गुण मिळवून खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. कु. जियाने सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. जे.ई.ई बी. आर्च. ही देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. अशा कठीण परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक मिळविणे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. कु. जिया हिला उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल तसेच शाळेतील प्राध्यापक रोहन खेडेकर, मानसी देवघरकर, गुरुप्रसाद देवघरकर, शुभम जड्याळ, राजेश जाधव, अनिल सिंग व तिचे पालक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्था चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. जियाचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेड येथील रोटरी स्कूलच्या जिया मेहता हिचा जे.ई.ई. बी.आर्च. परीक्षेत भारतात द्वितीय क्रमांक !
