खेड : तालुक्यातील कशेडी-गावणकरवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर यांना चिंचघर केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता उंचावण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्याकडे केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये प्रभाकर कोळेकर यांनी सेवा बजावली असून शाळेसह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मौलिक कामगिरी बजावली आहे. या पदोन्नतीबद्दल नवजीवन नामदेव शिंपी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल सदरे, उपाध्यक्ष सुनील सदरे, खजिनदार रमेश वंडकर, नंदलाल मुद्राळे, आनंद कोळेकर, मंगेश बागडे, रसिक वंडकर, दिलीप मुद्राळे, दत्तात्रय माळवदे, सागर ढेकणे आदी उपस्थित होते.
चिंचघर केंद्रप्रमुखपदी प्रभाकर कोळेकर !
