मुंबई : पुण्यात सख्ख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचाराने मन सुन्न झालंय घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का, हा प्रश्न अस्वस्थ करतोय. अशी प्रतिक्रिया भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी व्यक्त केली.

या हरामखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या लेकरांना वाचवायचं कसं हा प्रश्न आई बापांना पडलाय .आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पॅरोल न देण्याबाबत दिलेल्या सूचनांनी थोडा दिलासा मिळतोय .. पण… आयांनो, सावध रहा.
काळ बदललाय … आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा.