बीड : अनेकदा पतीकडून पत्नीला मारहाण किंवा तिला घराबाहेर काढल्याच्या बातम्या आपण पाहतो. मात्र बीडमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. बायको नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा, या अनोख्या मागणीसाठी एका तरुणाने आतापर्यंत पाच वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आता सहाव्यांदा हा तरुण थेट बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आत्महत्येचा इशारा देत आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या तरुणाने पुन्हा एकदा हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

सलग सहाव्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नितीन उबाळे असे या तरुणाचे नाव असून, त्याला इमारतीवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

▶ सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY