लांजा : (गोविंद चव्हाण) : लांजा तालुक्यातील आगरवाडी वारकरी मंडळी यांचा ‘माऊली हरिपाठ’ नावारूपाला आल्याने त्यांच्या कार्यक्रमाला वाढती मागणी होऊ लागली आहे.

केदारलिंग मंदिर, वेरवली; जांगलदेव मंदिर, आगरगाव; भांबेड भिंगार्डे यांच्या येथे; धावणेवाडी, लांजा; आगरवाडी, रामाणे; वनगुळे सत्येश्वर मंदिर; खोरनिंको, रणदिवे; कुवे, दुडये; खोरनिंको हनुमान मंदिर; वेरवली विठ्ठल मंदिर; जावडे, झिमण; इंदवटी, इंदवटकर; आगरवाडी, तुकाराम आग्रे; बोरुळे, खंडागळे; तसेच आगरगाव संतोषी माता मंदिर आणि कुवे शिवगर्जना मित्र मंडळ या ठिकाणी ‘माऊली हरिपाठ’ झाले.

या कार्यक्रमात प्रमुख ह.भ.प. दर्शन आग्रे, दीपक रामाणे व त्यांचे सहकारी सहभागी होतात. अगदी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, तसेच मुलींपासून महिलांपर्यंत सर्वजण हरिपाठात सहभागी असतात.