चिपळूण : भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती याला 26 मे 2026 रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण होत आहे.
या निमित्त संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे 26 मे ते 21 जून 2026 हा महिना तपपूर्ती मास म्हणून विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला जाणार आहे. या 12 वर्षात 10 ठळक जनहिताची कामे केली असे आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीच्या तपपूर्ती निमित्त जिल्ह्यात 5 जून पासून विविध कार्यक्रम राबविले जातील. दोन्ही जिल्हाध्यक्ष व आमचे सर्व पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.यावेळी भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, महिला शहराध्यक्षा रसिका देवळेकर, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, वैशाली निमकर, स्वानंद रानडे, सारिका भावे, माजी नगरसेवक विजय चितळे उपस्थित होते.
