चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात आज बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. लोटे येथून केमिकलने भरलेले ड्रम घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. यावेळी लोटे येथे कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कंटेनर आणि दुचाकी रस्त्याखाली कोसळले.

या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. लोटेतील एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून हा इसम कामाला होता. दुर्दैवाने अपघातात त्याचे निधन झाले. या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या अपघातामुळे
परशुराम घाटात वाहतूक आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.