खेड ( दिवाकर प्रभु ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चे राज्य समन्वयक आणि येथील कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ भरणे खेड या संस्थेच्या तालुक्यातील मुरडे येथील भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य संभाजी देवकते यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
शिक्षक संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय राहून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून श्री. देवकते यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याला राज्य पातळीवर अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल जिल्ह्यातील शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून विविध शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव आणि नेतृत्वगुण लक्षात घेता, सहसचिव या जबाबदारीतून ते शिक्षकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रा.संभाजी देवकते यांची राज्य शिक्षक महामंडळाच्या सहसचिवपदी निवड
