मुरूड जंजिरा (सुधीर नाझरे)
स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या विकासकावर प्रभावित होऊन व आगामी काळात आगरदांडा विकास कामे करून घेण्यासाठी आगरदांडा येथील मुस्लिम समाजाने शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेकडून विघ्नेश माळी हे निवडणुकीस उभे असून या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे स्थान बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे.आतापर्यंत शिवसेनेचे राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार विघ्नेश माळी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.आगरदांडा येथील मुस्लिम समाजाने जाहीर पक्ष प्रवेश केल्याने निश्चितच शिवसेनेची ताकद वाढणार आहे.मी सर्व मुस्लिम समाजाचे स्वागत करीत असून विकास कामात आम्ही कधी ही कमी पडणार नसल्याचे प्रतिपादन विघ्नेश माळी यांनी केले.या पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये साकिब गजगे ,अफझल सोंडे, सईड लांडेगे
,इरफान कादरी, अझ्मात दायंजी, अशफाक कादरी, ताहीर दायंजी, अहसान कादरी, मुदसर डावरे, अझन अल्वेरे, हिंदयात गजगे, उमेज कादरी, अमीर कादरी, नौशाद गजगे, अब्दुल सलाम गजगे आदी सह असंख्य लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी
रायगड जिल्हा निवडणूक निरीक्षक ऋषिकांत डोंगरीकर बांधकाम कामगार सेना अध्यक्ष दिनेश मिनमिने रायगड जिल्हा युवा सेना उपाध्यक्ष दीपेश वरणकर युवा सेना नेते विघ्नेश माळी, जावेद हादादी, मुस्तकी हादादी,आदी मान्यवर उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY