चिपळूण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) चिपळूण शहराच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरप्रमुख सचिन (भैया) कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानाचा त्रिवार मुजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्वराज्याच्या आदर्शांचे स्मरण केले. शिवरायांचे कार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या समाजजीवनासाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोवळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून ती जगविण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला. केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनालाही तेवढेच महत्त्व असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या दोन्ही कार्यक्रमांना विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव (बाळा) कदम, तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहरप्रमुख संजय रेडीज, राजू विखारे, विभागप्रमुख संकेत शिंदे, संतोष मिरगल, मयूर फुटकुरे, नगरसेविका वैशाली कदम, माजी नगरसेवक मनोज शिंदे, बंधू कदम, सतीश शिंदे, आकाश कदम, राहुल गुरव, महेंद्र खापरे, ऋषिकेश हरवंडे, आशिष कदम, साहिल मुजावर यांच्यासह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या अभिमानासोबत पर्यावरण संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने राबविलेल्या या दुहेरी उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
