महाड (मनोज खांबे):आज महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची बातमी मनाला खोल वेदना देणारी आहे. राज्याने आपले झुंजार, निर्भीड आणि कर्तृत्ववान नेतृत्व गमावले असल्याची भावना महाड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या व माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
“माझ्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर ज्या असह्य वेदना मनात दाटून आल्या होत्या, त्याच वेदना आज अजितदादांच्या जाण्याने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. महाराष्ट्राचा ‘दादा’ आज आपल्यातून निघून गेला आहे. सर्वांना पोरके करून जाणारा हा आघात सहन करणे अत्यंत कठीण आहे,” अशा भावनिक शब्दांत स्नेहल जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर सामान्य कार्यकर्त्यांचा आधार, शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे अशा भावना स्नेहल जगताप यांनी व्यक्त केल्या
या दुःखद घटनेची माहिती मिळताच स्नेहल जगताप तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. जगताप परिवार तसेच महाड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY