चिपळूण : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४-१, रिजन ५, झोन १ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर झाली आहे. अध्यक्ष पदी लायन डॉ. सौ. सविता दाभाडे, सेक्रेटरी लायन सौ. विद्या रेळेकर तर खजिनदार लायन रविना गुजर यांच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहोळा दि. २३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता हॉटेल मीरा एमआयडीसी खेर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. सविता दाभाडे या चिपळूणमधील ओंकार दातांचा दवाखान्याच्या संचालिका आहेत. गेली ४ वर्षे क्लबच्या सदस्य, ट्रेझर व सेक्रेटरी म्हणून कार्य केल्यावर आता अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कोविड काळात अविरत सेवा, २०२१ च्या पुरानंतर महिनाभर मोफत दंत तपासणी, शाळा-महाविद्यालयांत आरोग्य जागृती असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. २०२५ मध्ये त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाला आहे.

सेक्रेटरी सौ. विद्या रेळेकर या एम.एस्सी., बी.एड.व डी. बी. एम. असून डी.बी.जे. महाविद्यालयात रसायनशास्त्र प्राध्यापिका होत्या. चंदन क्लासेसच्या संस्थापक, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा व लायनेस क्लबच्या संस्थापक सदस्या आहेत. सध्या फाउंडेशनच्या संस्थापक व संचालिका म्हणून कार्यरत आहेत.

खजिनदार रविना गुजर या २०१० पासून लायन्समध्ये सक्रिय आहेत. प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्षा असून जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम, किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन असे सामाजिक उपक्रम
राबवतात. २०२२ च्या पुरात त्यांनी मोलाचे कार्य केले. त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी महिला उपाध्यक्षाही आहेत. डॉ. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली क्लब समाज उपयोगी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त होत आहे.