चिपळूण:- संस्कार भारती चिपळूण आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण या दोन्ही संस्थांचे भूतपूर्वअध्यक्ष असलेले रवींद्र धुरी यांचे नुकतेच गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुःखद निधन झाले. कै. रवींद्र धुरी हे चिपळूणातील एक सुप्रसिद्ध कलाकार, चित्रकार, सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार, ख्यातनाम मूर्तीकार असे व्यक्तिमत्व होते. नोकरी, व्यवसायानिमित्त ते चिपळूणमध्ये आले आणि चिपळूणचे झाले होते.
चिपळूण मधील अनेक सांस्कृतिक उपक्रम आणि सांस्कृतिक चळवळी तसेच चिपळूण मधील विविध संस्था यांच्याशी त्यांचा त्यांच्या कलाकारीमुळे घनिष्ठ संबंध होता. आणि म्हणूनच अशा या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलाकाराबद्दल बोलणेसाठीसाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संस्कार भारती उत्तर रत्नागिरी आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण यांचे वतीने मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूणच्या जांभेकर सभागृहांमध्ये एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी या शोकसभेसाठी आवर्जून उपस्थित राहून कैलासवासी रवींद्र धुरी यांच्याबद्दल भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहावी असे आवाहन संस्कार भारती अध्यक्ष श्री शरद तांबे आणि लो. टि. स्मा.अध्यक्ष डॉक्टर श्री यतीन जाधव यांनी केले आहे.