रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेर्डी शाखेच्या शाखा व्यवस्थापक सौ. प्रिया खानविलकर-मिरगल मॅडम यांना नुकतीच गुहागर तालुका सहाय्यक सरव्यवस्थापक पदावर बढती मिळाली.
त्याबद्दल त्यांचा चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक तथा प्रतिष्ठित व्यावसायिक श्री. अनिल शेठ दाभोळकर आणि खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. दशरथ शेठ दाभोळकर यांच्या हस्ते शाखेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी श्री. धनंजय शेठ दाभोळकर, श्री. रियाजभाई खेरटकर, श्री. विनोद खताते, श्री. विकास ढवण सर, श्री. सुनील सागवेकर, श्री. शशांक भिंगारे, श्री. अरविंद गुढेकर, श्री. यशवंत खताते, श्री. प्रसाद (भाऊ) देवरुखकर, श्री. चिन्मय दाभोळकर, श्री. संदीप सकपाळ, श्री. दिनेश माटे आदी उपस्थित होते.
