चिपळूण : राष्ट्रीय मातृ सुरक्षा दिनानिमित्त चिपळूण लायन्स क्लबतर्फे श्रद्धा हॉस्पिटल येथे मातांचा सन्मान करण्यात आला तसेच फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी कॅबिनेट ऑफिसर डॉ. विजय रीळकर, अध्यक्ष ला. श्रीनिवास परांजपे, सेक्रेटरी मिलिंद मुद्राळे, खजिनदार रमेश रेळेकर, कुरुंदवाडचे ज्येष्ठ मित्रवर्य ला. ॲडव्होकेट विजय जमदग्नी सर तसेच माता-भगिनी उपस्थित होत्या.