स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली असतानाच अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. समडोळी येथील मंधाना फार्महाऊसवर लग्नाची तयारी सुरू असताना स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. .सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये स्मृतीच्या वडिलांवर उपचार सुरु आहेत. यावेळी स्मृती मंधाना आणि तिचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. स्मृती मंधाना आणि पलश मुच्छलच्या लग्नाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

सांगलीत स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. परंतु, स्मृती मंधानाच्या वडिलांना विवाहस्थळीच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे स्मृती-पलशच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या लग्न सोहळ्यासाठी  क्रीडा व विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्तिथ राहणार होते. परंतु, लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता लग्नाचा मुहूर्त होता.दरम्यान,लग्न स्थळाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे.