गुहागर : गुहागर तालुक्यातील विद्युत मीटर ग्राहकांनी येणाऱ्या काळात सतर्क रहावे शासनाच्या वतीने आणि त्यांच्या आदेशानुसार स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू आहे मात्र ठेकेदार परस्पर मीटर लावत आहेत कोणते पूर्वकल्पना न देता आहे .मीटर लावले जात आहेत यापुढे कोणते स्मार्ट मीटर परवानगी न घेता लावले जाऊ नये असा सक्त इशारा आज वागल तालुका सरपंच संघटना व गुहागर तालुका विद्युत ग्राहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमान देण्यात आला आहे.

शृंगार तरी कार्यालयात आज संघटनेच्या पदाधिकारी यांनी अधिकारी यांची भेट घेतली .गुहागर तालुक्यातील विद्युत ग्राहक अर्थात मीटर धारकाने सावध राहावे कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर त्वरित पदाधिकाऱ्यांची संपर्क साधावा असे जाहीर आव्हान गुहागर तालुका विद्युत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
नियोजनानुसार आज तालुक्यातील विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने आपल्या समस्यांचे निवारण होण्याकरिता जमले होते यावेळी अधिकारी सोनावणे यांच्यासोबत अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली सरकारची व महावितरण ची भूमिका नक्की काय आहे याबाबत माहिती घेण्यात आली यावेळी यावेळी सरपंच संघटनेचे व गुहागर तालुका विदयुत ग्राहक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व विदयुत मीटर धारक उपस्थितीत होते.
तालुक्यातील शहरी भाग व ग्रामीण व भागातील विदयुत मीटर धारकांना आवश्यक सेवा मिळावी ठेकेदार यांनी मनमानी करू नये परस्पर वीज खंडीत करू नये गणेश उत्सव काळात जनतेला उत्तम सेवा मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पराग कांबळे यांचे सह अजित बेळवळकर विनोद जाणवळकर आरे सरपंच सम्मीर घाणेकर दिनेश कदम सरपंच विजय तेलगडे पोलीस पाटील विशाल बेलवळकर आबलोली सरपंच नेटके धोपावे सरपंच आशीर्वाद पावस्कर आदी प्रमुख नागरिक हजर होते