चिपळूण : सावर्डे उपविभाग अंतर्गत शाखा कार्यालय तुरंबव येथे दिनांक ६ जुलै सोमवार रोजी जोराचा वारा व पाऊस आल्याने महावितरणच्या दहा ते पंधरा मुख्य प्रवाहच्या पोलांचे नुकसान झाले होते. त्यामुळे वीर, पुरये, तोंडली, शिरंबे सडेवाडी इत्यादी गावांचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे २४०० ग्राहक अंधारात होते, तरी त्यानंतर दोन दिवसाच्या आत १० ते १५ पोल उभे करून तोंडली, वीर, पुरये , शिरंबे सडेवाडी इत्यादी गावांचा विद्युत पुरवठा शाखा कार्यालय तुरंबव यांनी चालू केला.जवळजवळ २४०० ग्राहक दोन दिवस अंधारात होते.त्यांचा विद्युत पुरवठा तातडीने चालू झाला.त्यामुळे वीर, पुरये, तोंडली गावातून शाखा अभियंता श्री. प्रवीण राऊत तसेच उपकार्यकारी अभियंता श्री अनिल खोडे व शाखा कार्यालय तुरंबव मधील सर्व स्टाफ यांचे सर्व स्तरातून व ग्रामस्थांकडून कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे.
वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अवघ्या दोन दिवसांत पूर्ववत; महावितरणच्या तुरंबव शाखेचे सर्वत्र कौतुक
