चिपळूण : रोटरॅक्ट क्लब चिपळूण च्या २०२६-२७ करीत अध्यक्षपदी सिद्धेश नितीन जाधव यांनी तर सचिव पदी मृणाल करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समारंभाला रोटरी क्लब चे इंस्टॉलिंग ऑफिसर विक्रमसिंह कदम, असिस्टंट गव्हर्नर बिपिनचंद्र गांधी, रोटरी क्लब चिपळूणचे चे अध्यक्ष शैलेश टाकळे ,सचिव रोहन देवकर आणि खजिनदार मंगेश गोंधळेकर यांच्यासह रोटरी परिवारातील सर्व सदस्य कुटुंबीय आणि रोटरॅक्ट क्लब चिपळूणचे सर्व सदस्य उपस्थित होते.

अध्यक्ष सिद्धेश नितीन जाधव हे फार्मासिस्ट असून त्यांचे बी.एस.सी केमिस्ट्री मधून आणि बी.एस.सी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे शिक्षण त्यांचे झाले असून एजिस मल्टी स्पेशालिटी क्लिनिक खेर्डी चे संचालक आहेत. तर सचिव मृणाल करंजकर हे सुद्धा फार्मासिस्ट असून ते गोविंदराव निकम कॉलेज फार्मसी मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत त्याचबरोबर त्यांचे पेटमाप येथे संजीवनी मेडिकल चालवत आहेत.

रोटरॅक्ट क्लब चिपळूणच्या नव्या कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सिद्धेश जाधव यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली. संपूर्ण चिपळूण तालुक्यासाठी ‘आरोग्य संजीवनी योजना’ सुरू करण्यात आली असून, या योजनेबाबत माहिती देताना नवनियुक्त अध्यक्ष म्हणाले की, “आर्थिक अडचण किंवा वेळेअभावी कोणीही उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना वर्षभर मोफत राबवली जाईल. आमचे व्हॉलेंटियर्स गावोगावी जाऊन घरोघरी हे कार्ड पोहोचवत आहेत.” या योजनेअंतर्गत डॉक्टरांचा सल्ला, दंत तपासणी, आहार मार्गदर्शन, फिजिओथेरपी, तसेच बीपी, शुगर आणि ईसीजी (ECG) तपासणी पूर्णपणे मोफत असेल.

त्याच बरोबर आठवड्यातून एक दिवस गावोगावी जाऊन मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमाबद्दल रोटरी परिवार आणि चिपळूणकरांकडून रोटरॅक्ट क्लबचे कौतुक होत आहे. सर्व सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.