पेण (प्रशांत पोतदार) : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आदिवासी वाडीत ५ वर्षीय बालिकेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार रात्रीपासून बेपत्ता असलेली बालिका मंगळवारी सकाळी वस्तीपासून सुमारे १० मीटर अंतरावर मृतावस्थेत सापडली. – अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे – माहिती मिळताच श्वानपथकासह पोलिसांनी शोधमोहीम राबवली – रायगड एसपी आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
- संशयित किरण भिकू वाघमारे वय २४ याला ताब्यात घेण्यात आले आहे
- मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे
घटनेमुळे पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पुढील तपास पेण पोलीस करत आहेत.