चिपळूण : शहरातील पागमळा येथील दोन बंद फ्लॅट आणि मार्कंडी परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याचे वृत्त आहे .
या संदर्भात अधिकृतपणे तक्रार दाखल करायला कोणीही पुढे आले नसले तरी पोलिसांनी घरफोड्या झालेल्या ठिकाणी ताबडतोब तपासकार्य करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे . याबाबत सूत्रांनी माहिती देताना सांगितले कि पागमळा येथील एकाच अपार्टमेंट मधील दोन बंद फ्लॅट चोरटयांनी फोडून रोख रक्कम लांबविली, तर मार्कंडी भागातील तीन दुकानांच्या शटर ची पट्टी वाकवून चोरी केली . याबाबत चिपळूण पोलीस अत्यंत वेगाने तपास करत आहेत . सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन चोरटे चोरीचा प्रयत्न करताना आढळून आले .
चिपळुणात पाच घरफोड्या
