मुंबई – नीट (NEET) २०२६ च्या परीक्षेत बारामतीची कन्या कुमारी श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम येत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
दरम्यान या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी श्रावणी कुदळे हिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी श्रावणीच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तिच्या शिक्षकांचेही अभिनंदन केलेच तसेच, “दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत,” अशी भावनाही व्यक्त केली.