चिपळूण : रोटरी क्लब ऑफ चिपळूणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्योजक श्री. शैलेश टाकळे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. महादेव (बाळा) कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहरप्रमुख संजय रेडीज, राजू विखारे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, उपजिल्हा संघटक ऐश्वर्या घोसाळकर, शहर संघटक वैशाली शिंदे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, रोटरीसारख्या सेवाभावी संस्थेचे नेतृत्व ही समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची मोठी जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच, श्री. टाकळे यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लबकडून समाजोपयोगी, शैक्षणिक, आरोग्यविषयक व लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छाही देण्यात आल्या.