चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या १,२०० वृक्षारोपण उपक्रमाचीही माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.