चिपळूण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असून त्यानिमित्ताने चिपळूण शहर मंडल तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे रक्तदान शिबिर अपरांत हॉस्पिटल भोगाळे चिपळूण येथे पार पडणार असून रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रक्ताचा असणारा तुटवडा भरून काढण्यासाठी भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम घेण्यात आलेला आहे. यासाठी महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर युवा मोर्चा अध्यक्ष शुभम पिसे व या रक्तदान शिबिराचे संयोजक संदीप भिसे व सह संयोजक संगीता पालकर हे विशेष मेहनत घेत आहेत. तरी रक्तदात्यांनी आपली नावे त्वरित नोंदवून सहकार्य करावे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- चिपळूणच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये ‘दि चिपळूण अर्बन बँके’कडून शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांचा विशेष सन्मान व शुभेच्छा…!
- विजयराव गुजर यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार..
- पोफळी गावच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप मोहिते यांचे बिनविरोध निवड…
- रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५७८ दहीहंड्या..
- विक्रम साबळे फाउंडेशनच्या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…