चिपळूण : माँसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ६ सप्टेंबर रोजी चिपळूण तालुक्याच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी चिपळूण जनसंपर्क कार्यालय येथे माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर एकविरा देवी मंदिरात महिला शिवसैनिकांनी खणा-नारळाने देवीची ओटी भरली. यावेळी तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत एकविरा देवीकडे गाऱ्हाणे मांडत हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे स्वप्न साकार व्हावे, संस्कारक्षम महाराष्ट्र घडावा, अशी सामूहिक प्रार्थना केली. तसेच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि रक्षणासाठी यश मिळावे, अशीही प्रार्थना करण्यात आली.
देवीच्या चरणी भरलेली ही ओटी केवळ धार्मिक विधी नव्हती, ती माँसाहेबांनी जपलेल्या संस्कारांची, बाळासाहेबांनी जागवलेल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि शिवसेनेच्या विचारांवरील निष्ठेची प्रतीकात्मक ओटी होती.
यावेळी महिला आघाडी उपजिल्हा संघटक ऐश्वर्या घोसाळकर, तालुका संघटक मानसी भोसले, शहर संघटक वैशाली शिंदे, उपशहर संघटक फिरदोस कवारे, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन (भैया) कदम, युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, युवासेना विभाग प्रमुख राहुल गुरव, शुभम शिंदे, देवांग खेडेकर, नीरज चव्हाण व श्री. कवारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माँसाहेबांच्या स्मृती म्हणजे केवळ भूतकाळाची आठवण नव्हे, तर संस्कारांची पुढची पिढी घडविण्याची जबाबदारी. चिपळूण तालुक्याने प्रतिमापूजनापासून देवीच्या चरणी भरलेल्या ओटीपर्यंत हीच संस्कारनिष्ठ परंपरा जपण्याचा संदेश दिला.
