चिपळूण : भारतीय सागरी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आयएमयू-सीईटी (IMU-CET) या देशपातळीवरील प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत खेड येथील रोटरी स्कूलचा विद्यार्थी महंमद अरश मुबीन राजिवटे याने कठीण परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून रोटरी स्कूल, खेडचे नाव देशपातळीवर गौरविले आहे.

संपूर्ण देशातून तब्बल ७२ हजार विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. देशातील अग्रगण्य तोलानी महाविद्यालय, तळेगाव (पुणे) येथे त्याची निवड झाली आहे.

रोटरी स्कूलचे चेअरमन श्री. बिपीन (दादा) पाटणे, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवर्ग तसेच रोहन खेडेकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्यामुळे त्याला हे यश मिळाले आहे.

महंमद अरश मुबीन राजिवटे हा सामाजिक कार्यकर्ते व साहित्यप्रेमी महंमद झारे यांचा नातू आहे.