खेड :- येथील नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील थकित पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राहणार आहे. नपा प्रशासनाच्या पाणीपट्टी विभागाकडुन सतत नोटीसा बजावुनही पाणीपट्टीची रक्कम न भरणा-या थकबाकीदारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. जवळपास 45/50 लाख पाणीपट्टी कराच्या रक्कमेपैकी 12/15 लाख रुपये पाणीपट्टी कराची रक्कम वसुल झाली आहे.
शहरात 1500 हुन अधिक व्यावसायिक व निवासी ग्राहक आहेत. यातील बहुतांश ग्राहकांकडे पाणीपट्टी कराची रक्कम थकली असुन, नपा प्रशासनाने पाणीपट्टी कराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देवुनही, याला मुदतवाढीलाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याची खंत व्यक्त करण्यात आली असून, पाणीपट्टी कराची रक्कम न भरणा -या नागरीकांच्या नळजोडणी तोडण्याची धडक मोहीम मुख्याधिकारी श्री महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली आहे. नगरपालिकेच्या नळजोडणी धडक मोहिमेची दखल घेऊन थकबाकीदार थकित नळपाणीपट्टी कराची रक्कम नपा कार्यालयात येऊन भरणा करण्याचे करीत आहेत.
थकित नळपाणीट्टी कराची रक्कम तात्काळ भरणा करावी..
ज्या नळधारकांनी अद्याप पाणीपट्टी कराची रक्कम भरलेली नाही, त्यांनी नळ जोडणी खंडीत होणे आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी थकित रक्कम तात्काळ भरणा करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी श्री. महादेव रोडगे यांनी केले आहे.
नपाच्या तिजोरीत 15 लाखांहून अधिक रक्कमेचा भरणा झाला आहे. थकित पाणीपट्टीधारकांच्या नळतोडणीच्या मोहिमेमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.