खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात 14 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 2 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने विविध जनहितकारी उपक्रमांतर्गत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे’ आयोजन ज्ञानदीप महाविद्यालयात करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यास विविध कंपन्या, सेवा क्षेत्रातील आस्थापनांचे प्रतिनिधीं तसेच ११० उमेदवार सहभागी झाले होते. यामध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार विविध पदांसाठी मुलाखती व प्राथमिक निवड प्रक्रिया घेण्यात आली. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपलब्ध रोजगाराच्या संधी, पदांचे स्वरूप, आवश्यक पात्रता, कौशल्ये तसेच करिअरमधील प्रगतीच्या संधी याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यामुळे परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाल्या. यामधून १४ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तर २ उमेदवारांना प्रत्यक्ष निवडपत्र देण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आरती गुहागरकर व श्री. योगेश शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले, त्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा, संस्थेचे सर्व सभासद यांचेकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.