चिपळूण : निवळी येथे मित्र कीटकांबाबत प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन निवळी येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मित्र कीटकांची ओळख व त्यांचे शेतीतील महत्त्व या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना मधमाशी, लेडीबर्ड बीटल, कोळी, ड्रॅगनफ्लाय यांसारख्या मित्र कीटकांची ओळख करून देण्यात आली. हे कीटक पिकांवरील हानिकारक किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण करण्यास मदत करतात, त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण तसेच शाश्वत शेतीला चालना मिळते, याबाबत माहिती देण्यात आली. मित्र कीटकांचे संवर्धन करण्याचे महत्त्वही उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापण आणि मित्र कीटकांचे संवर्धन यांचे महत्त्व कृषी तज्ज्ञही अधोरेखित करतात. हा उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले तसेच सर्व विषयतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषीदूत वैष्णवी कोकरे शितल डोहळे मयुरी गावडे सानिका भोसले यांनी सहभाग घेतला.
निवळी येथे मित्र कीटकांच्या महत्त्वाबाबत प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
