चिपळूण : चिपळूण मध्ये सुद्धा एक सर्वसामान्य भारतीय नागरिक व शिक्षक मुख्याध्यापक परवेज पीरजादे सर यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र समोर सोनम वांगचूम यांच्या समर्थनार्थ व आपल्या भारतातील असंख्य मुलांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या काळजीपोटी स्वतः पहिले एकटे उभे राहिले.
हळूहळू सर्व चिपळूण आतील नागरिक त्यांच्या सहकार्यास उभे राहून सोनम या वांगचूप यांच्या आंदोलनाला आमचा सुद्धा जाहीर पाठिंबा आहे .अशा पद्धतीचे हातात बोर्ड घेऊन पावसात भिजत या आंदोलनात सहभाग असल्याचे नोंदवला आहे. दिल्ली पासून चिपळूण पर्यंतचा आवाज हा कधीही मिटणार नाही थांबणार नाही. यापुढे सुद्धा हा आवाज जोपर्यंत पंतप्रधान व केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या आंदोलनाची धक धक वाढतच राहणार .भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी व सरकारने रणनीती आखून दडपशाही करण्याचा जो प्रयत्न केला आहे. त्या दडपशाहीच्या विरोधामध्ये हा आवाज उठला आहे .
कदाचित संख्येने कमी असू पण विचारांनी कधीही मागे पडणार नाही लोकशाही मार्गाने व संविधानिक पद्धतीने हे आंदोलन यापुढे वाढत राहील व सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अशाच पद्धतीचा सपोर्ट नेहमीच राहील या आंदोलनामध्ये प्रमुख म्हणून ज्याने सुरुवात केली ते परवेज पीरजादे सर ,पेडणेकर सर ,अजय पवार, आकाश कांबळी, शुभम कदम, रोहित कदम, प्रसन्न मोहिते, सुबोध सावंत देसाई, अरुण मोहिते ,निलेश मोहिते आधी सर्व वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित येऊन या आंदोलनाला सहकार्य व आपला सहभाग नोंदवला आहे.
