चिपळुण : चिपळुण शहरातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रातील एक अग्रणी संस्था क्राउन मोटर ड्रायविंग स्कूल रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . त्यानिमित्ताने उद्योगाच्या यशस्वी घोडदौडीचा घेतलेला आढावा .

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरात किंवा आखाती देशात नोकरी पत्करावी हा कोकणातील सर्वसामान्य युवकांनी स्वीकारलेला करिअर चा पर्याय. त्याला अपवाद ठरले एक व्यक्तिमत्व श्री ईब्राहीम सरगुरोह, ज्यांनी आपल्या मातृभूमीत यशस्वी व्यवसाय करुन इतरांनाही रोजगार देण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि २५ वर्षांपूर्वी चिपळूण शहरात “क्राउन मोटर ड्रायव्हिंग स्कूल” च रोपटं लावत चिपळूणकरांना उत्तम दर्जाची व सुलभपणे वाहन शिकवून परवाना देणारी संस्था सुरु केली. सर्व शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करुन ग्राहकांना सुरक्षित ड्रायव्हिंग शिकवत ही संस्था गेल्या पंचवीस वर्षात हजारो चिपळूणकरांच्या पसंतीस उतरली. यंदा “क्राउन मोटर ड्रायव्हिंग स्कूल” रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे आणि या यशाचं श्रेय त्याच्या विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवेला जाते. संचालक “इब्राहिम सरगुरोह” हे स्वतः एक सामाजिक क्रीडा व राजकीय क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्व. क्राउन च्या यशाचे श्रेय ते आपल्या कर्मचाऱ्यांना देतात ज्यांना त्यांनी कुटुंबातील एक घटक मानले. या विश्वासामुळे धीरज मोहिरे सारखे क्राउन कुटुंबातील सदस्य गेली पंधरा वर्षे संस्थेसोबत एकनिष्ठपणे कार्यरत आहेत. बॅक ऑफिस स्टाफ, ट्रेनिंग स्टाफ यांचे क्राउन संस्थेच्या जडणघडणीत मोठे योगदान असल्याचे ते सांगतात.
संस्थेने सन २००८ ते २०१४ या कालावधीत समाजकल्याण विभागासामार्फत राबविलेल्या योजनेचा लाभ अनेक दुर्बल घटकांपर्यंत यशस्वीरीत्या पोचविण्याचे कार्य केले व याद्वारे अनेक युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली. नुसतेच परवाने देण्यापेक्षा ग्राहकांना ड्रायव्हिंग चे सखोल ज्ञान देण्यासाठी या क्षेत्रातील मुंबई सारख्या शहरातील तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा आयोजित करणे, रस्ते सुरक्षाविषयक प्रबोधन करणे हे उपक्रम राबवत क्राउन ने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. क्राउन परिवारातील सदस्य स्वतःचा व्यवसाय समजून ग्राहकांना तत्पर सेवा देतात हेच क्राउनच्या यशाचे गमक असल्याचे संचालक इब्राहिम सरगुरोह मानतात. अशा कर्मचाऱ्यांमुळेच इब्राहिम सरगुरोग यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रात योगदान देता आले. क्रिकेट खेळाची उत्तम तांत्रिक माहिती असणारे इब्राहीम सरगुरोह क्रिकेट खेळातील प्रसिद्ध लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून चिपळूण शहरातील ॲकॅडमी मध्ये युवा खेळाडूंना घडविण्याचे कार्य करतात. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चे सदस्य म्हणून देखील त्यांनी खेळासाठी भरीव योगदान दिले आहे. भाषेवरील प्रभुत्व व खेळाची उत्तम जाण यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीचे समालोचक अशी देखील भाईंची ओळख आहे. नोकरी करण्यापेक्षा सचोटीने यशस्वी व्यवसाय करुन इतरांना रोजगाराच्या संधी देण्याचे भाईंचे कार्य कोकणातील युवकांना व्यवसायाकडे वळण्याची प्रेरणा देणारे आहे.

रौप्यमहोत्सवी वर्षाच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना भविष्यात “क्राउन मोटर ड्रायव्हिंग स्कूल” चा वटवृक्ष बहरत जावो ही मनःपूर्वक सदिच्छा.