खेड (मंदार आपटे) : खेड शहरामध्ये कोजागिरी पौर्णिमेनंतर काकड आरतीला सुरुवात होते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत खेड तालुक्यात ठीक ठिकाणी काकड आरती चालू होते खेड शहरांमध्ये अनेक मंदिरांमध्ये सकाळी आरत्यांचे सुर ऐकू येतात भूपाळी भजन असे म्हणत देवाला आरती म्हटली जाते रोज देवाला आळीपाळीने ग्रामस्थ गोडधोड नैवेद्य दाखवतात शहरांमध्ये श्रीकृष्ण मंदिर कुवारसाई, सोनार आलीमधील विठोबा रखुमाई मंदिर , ब्राह्मण आळीत येथीललक्ष्मीनारायण मंदिर भडगाव येथील श्रीकृष्ण मंदिर अशा अनेक गावांमध्ये काकड आरतीचे सूर ऐकू येतात तालुक्यात अनेक मंदिरांमध्ये ही प्रथा आजही श्रद्धेने जोपासली जाते अनेक वयोवृद्ध माणसं अनेक तरुण वर्ग देवावर भक्ती भावाने देवावर अभिषेक करत काकड आरतीला येतात.. ब्राह्मण आळीत येथील लक्ष्मीनारायण मंदिरात गेली अनेक वर्ष हा सण आनंदाने साजरा केला जातो सगळे समाजबांधव एकत्र येऊन गुण्यागोविंदाने मंदिरामध्ये काकडा पेटवून गाभाऱ्या भोवती प्रदक्षिणा घातल्या जातात अशा अनेक चाली परंपरा जपत उत्सव साजरा केला जातो.
काकड आरती मध्ये खेडवासी झाले तल्लीन…
