मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी काळातील पक्षाची वाटचाल, विविध राजकीय व संघटनात्मक विषय तसेच पक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढवून पक्षाला राज्यभरात अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी सर्व प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला.
