चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी जिल्ह्यातील विविध मंडलांच्या प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये सौ. स्वप्ना यादव यांची चिपळूण ग्रामीण प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर पक्षसंघटना मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भाजपच्या वतीने २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या संघटनात्मक नियुक्तीपत्रानुसार जिल्ह्यातील आठ पदाधिकाऱ्यांची विविध भागांच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये सौ. स्वप्ना यादव यांची चिपळूण ग्रामीण प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण ग्रामीण भागातील भाजप संघटनेच्या कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
इतर नियुक्त्यांमध्ये श्री. सचिन वहाळकर यांची रत्नागिरी शहर प्रभारी, श्री. अशोक मयेकर यांची रत्नागिरी दक्षिण प्रभारी, श्री. दत्ता देसाई यांची रत्नागिरी उत्तर प्रभारी, श्री. सतीश शेवडे यांची रत्नागिरी मध्य प्रभारी, श्री. अमित केतकर यांची लांजा-राजापूर प्रभारी, श्री. प्रमोद अधटराव यांची संगमेश्वर प्रभारी, तर श्री. मधुकर लिमकर यांची चिपळूण शहर प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी या नियुक्त्या जाहीर करत सर्व नवनियुक्त प्रभारींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्त्यांमुळे रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्वप्ना यादव यांच्या नियुक्तीबद्दल चिपळूण परिसरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.