महाराष्ट्रावरील संभाव्य दुष्काळी संकट दूर होऊन शेतशिवारात पुन्हा हिरवाई नांदावी, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि पशुधनाचे भविष्य सुरक्षित राहावे, यासाठी मा. विनायकजी राऊत साहेब यांनी आपल्या संवेदनशील मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
शेतीमातीवरील संकटाची जाणीव आणि बळीराजा व पशुधनाच्या भविष्याची चिंता व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्रावरील संभाव्य दुष्काळी संकट दूर होण्यासाठी आदिशक्तीच्या चरणी साकडे घातले. राज्यातील शेतशिवार पुन्हा हिरवेगार व्हावे आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी भावना या मनोगतातून व्यक्त होते.