चिपळूण : विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी आशेचा किरण ठरलेल्या व्हिजन एव्हिएशन अकॅडमीने आपल्या यशस्वी वाटचालीची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. या दशकपूर्तीचे औचित्य साधून अकॅडमीचा दहावा वर्धापन दिन सोहळा *शहरातील राधाताई लाड सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्याने पार पडला.

स्वप्नांना पंख देणारा एक दशकाचा प्रवास

“Where Dreams Take Flight & Futures Soar” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत व्हिजन एव्हिएशन अकॅडमीने गेल्या 10 वर्षांत शेकडो विद्यार्थ्यांना एव्हिएशन, एअर होस्टेस, ग्राउंड स्टाफ, एअरपोर्ट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रात करिअरची दिशा दिली आहे. “A Journey of Passion, A Legacy of Excellence, A Future of Endless Possibilities” असा हा प्रवास केवळ कोकणापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारा ठरला आहे.

या सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अकॅडमीच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूणचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम, माजी आमदार श्री. रमेशभाई कदम*, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय जाधव, नगरसेविका सौ. नसरीन खडस, नगरसेविका सौ. वांगडे यांसह शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात आमदार शेखर निकम म्हणाले, “कोकणातील मुलांनी आता केवळ पारंपरिक नोकऱ्यांच्या मागे न लागता एव्हिएशनसारख्या ग्लोबल क्षेत्रात आपले भविष्य घडवावे. व्हिजन अकॅडमीने चिपळूणसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.”

माजी आमदार रमेशभाई कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एव्हिएशन क्षेत्रातील वाढत्या संधींवर प्रकाश टाकला.

संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, पुढील काळात अकॅडमी अधिक आधुनिक अभ्यासक्रमावर भर देणार आहे.

“Together We Fly Higher!” चा संदेश देत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक,आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अकॅडमी परिवारातर्फे करण्यात आले.