चिपळूण : संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत ओमेगा गार्डन हॉल, सावरकर चौक, देवरुख येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पुमसे स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेत चिपळूण तालुक्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला.

विविध वयोगटांमध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी करत चिपळूण तालुक्याला अजिंक्यपद मिळवून दिले.

या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे *अध्यक्ष व्यंकटेशराव कररा,उपाध्यक्ष संजय सुर्वे,सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तसेच जिल्हा पंच प्रमुख श्री. भरत कररा तसेच श्री. प्रवीण आवळे, श्री. रोहित शिंदे यांनी सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षकांचे कौतुक केले.