चिपळुण : कोकणातील नामवंत साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांचे चिरंजीव डॉक्टर राजरत्न आकांक्षा राष्ट्रपाल सावंत यांच्या ओजस हॉस्पिटलचे उद्घाटन तथा शुभारंभ दिनांक 19 जुलै रोजी चिपळूणतील नामवंत डॉ. यतीन जाधव, यांच्या हस्ते डॉ अभिजित सावंत, डॉ. साक्षी मोहिते,चिपळूण न प चे मुख्याधिकारी जाधव, साहित्यिक इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे, यांच्या प्रमुख पार पडला.
चिपळूण शहरातील पंचायत समिती जवळ मुंबई गोवा महामार्ग लगत माता रमाई भवन येथे ओजस हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आज पार पडला. तालुक्यातील कळमुंडी गावचे सुपुत्र तथा उमरोली येथील रहिवासी डॉ. राजरत्न राष्ट्रपाल सावंत (बी ए एम एस, एम डी- इ एम एस, सी सी एच , सी व्ही डी, फेलोशिप इन इंटरनल मेडिसिन) यांच्या पुढाकारातून हे रुग्णालय सुरू झाले आहे. या उद्घाटन समारंभाला लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे ज्येष्ठ मार्गदर्शक समन्वयक प्रकाश देशपांडे, कार्याध्यक्ष साहित्यिक अरुण इंगवले, संचालक अभिजित देशमाने कार्यवाह विनायक ओक,श्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अभिजीत सावंत, नामवंत त्वचारोग तज्ञ डॉ.यतीन जाधव, प्राथमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संचालक संतोष कांबळे, अमोल भोबस्कर, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे तालुका सरचिटणीस संदेश पवार, माजी सरचिटणीस रमाकांत सकपाळ , उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, सहचिटणीस प्रमोद कांबळे, डॉ.अशोक सकपाळ, विलास सकपाळ, राकेश जाधव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालंय कार्यवाह सुमेध करमरकर, प्रदीप पवार,गणेश सोनावणे, प्राची जोशी,सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, महंमद झारे, कैसर देसाई,प्रा. प्रकाश जोशी ,सी ए कुलकर्णी,न प. चिपळूण चे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबकर प्रशांत मोहिते, उमेश सकपाळ, सुभेदार मोहिते,गजानन यादव, वैभव गराटे,,सुभाष जाधव, सुलेखा जाधव ,रमाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोक सकपाळ, धम्म कमिटीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ बौध्दउपासक प्रभाकर सकपाळ,शाहीर प्रा प्रदीप मोहिते गायक प्रविण मोहिते, सचिन सावंत, नितीन सावंत, अरविंद सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ओजस हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ.यतीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर हॉस्पिटलच्या नामफलकाचे अनावरण चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार रमाकांत सकपाळ व बुद्धघोष गमरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपाल सावंत यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी सर्वांचे मनस्वी स्वागत करून भूमिका विशद केली. तदनंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा डॉ.राजरत्न सावंत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . तसेच इतर मान्यवरांचा राष्ट्रपाल सावंत व सौ आकांक्षा सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. यतीन जाधव , डॉ.अभिजीत सावंत,प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, ऍड सुरसेन गमरे,मुख्याधिकारी संजय जाधव, संतोष कांबळे,प्राची जोशी, मनीषा दामले,संदेश पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. डॉ. राजरत्न सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चिपळूणवासीयांना आपल्याकडून उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक ,सांस्कृतिक आणि ग्रंथालय चळवळीतील अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार संदेश पवार यांनी मांडले.
