मुंबई : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांनी त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दादांच्या आठवणींनी धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह उपस्थित सर्वच भावूक झाले. तसेच, दादांचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करावा लागत असल्याच्या भावनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईसह राज्यातील तसेच कर्नाटकातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.